'राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पोलिस स्टेशनला जाणे ही शरमेची बाब'|Politics|Maharashtra|Sarakarnama

2021-06-12 0

जळगाव : आज जनतेचा जीव वाचविण्याची गरज आहे, अशा वेळी रेमडेसिव्हिरसाठी राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पोलिस स्टेशनला जाणे ही शरमेची बाब आहे, अशी टीका शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. रेमडेसिव्हिरचा वाद करून केवळ फक्त तेवढ्या कामाकरीता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पोलिस स्टेशनला गेले होते. मात्र त्यांनी तेथे न जाता रेमडेसिव्हिर राज्यातील जनतेला कसे मिळेल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रयत्न केले असते, तर त्यांचीही वाहवा झाली असती.
#GulabraoPatil #Shivsena #BJP #Coronavirus #remdesivirinjection #Jalgaon #Maharashtra #DevendraFadnavis #PravinDarekar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires